ढोकी :आरोपी नामे-1)नितीन पांडुरंग शरणागत,2) सचिन पांडुरंग शरणागत, 3) बाळु पांडुरंग शरणागत, 4) सुनिल पांडुरंग शरणागत, 5) मेघराज पांडुरंग शरणागत, 6) कोहिनुर बाळु शरणागत सर्व रा. दत्त नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 13.03.2024 रोजी 09.15 ते 09.30 वा. सु. ढोकी येथे फिर्यादी नामे- भागाबाई उर्फ भामा राजेंद्र काळे, वय 35 वर्षे, रा. दत्तनगर ढोकी ता.जि. धाराशिव यांना व त्यांचे नातेवाईक यांना नमुद आरोपींनी दारासमोर मोटरसायकल लावण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मरहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी भागाबाई काळे यांनी दि.15.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 323, 504भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1)महादेव जगन्नाथ शेटे रा. देवळाली ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 14.03.2024 रोजी 20.30 वा. सु. देवळाली येथे फिर्यादी नामे-श्रीनिवास अभिमान शेटे, वय 39 वर्षे, रा. देवळाली ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने पोलीस स्टेशनला तक्रार का दिली या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे मामाचा मुलगा शिवानंद मिटकरी हा भांडण सोडवण्यास आला असता त्यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रीनिवास शेटे यांनी दि.15.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम :आरोपी नामे-1)संतोष श्रीमंत औताडे, 2) बाबुरव सोपान औताडे, 3) सुभाष मुरलीधर औताडे, सर्व रा. गोरमाळा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.15.03.2024 रोजी 08.00 वा. सु. मारुती मंदीरापसुन जुन्या तालीम जवळ गोरमाळा येथे फिर्यादी नामे-दत्तात्रय रामदास औताडे, वय 35वर्षे, रा. गोरमाळा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी नळाला पाणी येत नाही असे बोलण्याचे करणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व चाकूने ओटावर मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी दत्तात्रय औताडे यांनी दि.15.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.