कळंब :फिर्यादी नामे-सुर्यकांत नामदेवराव ढवळे, वय 70 वर्षे, रा. पुर्नवसन सावरगाव, खंडोबा मंदीर जवळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे अंदाजे 43,000 ₹ किंमतीचे महिंद्रा मॅक्स पिकअप क्र एमएच 10 के. 8386 इंजिन नं MA1ZA2ABA31L34962 दि. 10.03.2024 रोजी 23.30 ते दि. 11.03.2024 रोजी 05.00 वा. सु. फिर्यादी सुर्यकांत ढवळे यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुर्यकांत ढवळे यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : दि. 12.03.2024 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. टोरंट सोलर लिमीटेड होर्टी येथे शेत गट नं 264, 230, 336 1/1 मधील पवनचक्कीचे आर्थिक कॉपर वायर 660 मिटर अंदाजे 90,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल रामचंद्र कुंभार, वय 40 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी टोरंट सोलारजन लिमीटेड कंपनी होर्टी रा. ओमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
उमरगा : दगडधानोरा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- राजु भाउराव शिंदे, वय 52 वर्षे हे दि. 14.03.2024 रोजी 09.30 वा. सु.उमरगा येथुन तुरोरी कडे नौकरीस जात असताना एनएच 65 रोडवरील भागीरथी धाब्याचे थेडे अंतरावर पुढे चार अनोळखी इसम दोन मोटर सायकलवर येवून राजु शिंदे यांना पोलीस अधिकारी असल्याची बतावनी करुन तुमचे मोटरसायकलचे गाडीचे लायसन व कागदपत्र दाखवा म्हणून कागदपत्रे बघून त्यांचे गळ्यातील 02 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट अंदाजे 24,000 ₹ किंमतीचे गळ्यातुन काडून खिशात ठेवा गळ्यात घालून कुठे फिरता असे म्हणून फसवणुक करुन त्या चार भामट्यांनी हातचलाखीने शिंदे यांचे नमूद सुवर्ण दागिणे लांबविले. अशा मजकुराच्या राजू शिंदे यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलीस ठाणे उमरगा येथे भा.दं.वि.सं. कलम- 170, 419, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.