ढोकी :आरोपी नामे-1)बापु काळे, 2) राजेश काळे, 3) बाबर चव्हाण, 4) शंकर काळे, 5) दिपक पवार, 6) बप्पा काळे, 7) सुनिता पवार, 8) शकु काळे, 9) मामा काळे, 10) कुंचाबाई काळे सर्व रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 13.04.2024 रेजी 21.30 ते 22.15 वा. सु. दत्तनगर ढोकी येथे फिर्यादी नामे- सुनिल पाडुरंग शरणागत, वय 29 वर्षे, र. दत्तनगर ढोकी ता.जि. धाराशिव यांना नुद आरोपींनी तुमच्या घरा समोर बसा असे म्हणालेचे करणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी करुन दगडफेक करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी सुनिल शरणागत यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 325, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी :आरोपी नामे-1)भाग्यश्री अजिनाथ भोगील, रा. दांडेगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 13.03.2024 रोजी 16.00 वा. सु. दांडेगाव शिवारातील शेतात फिर्यादी नामे- सुरवंत हनुमंत भोगील, वय 35 वर्षे, रा. दांडेगाव ता. भुम जि. धाराशिव यांना शेतातील दगड व कॉग्रेस गावत शेतात टाकण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सुरवंत भोगील यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.