धाराशिव : मयत नामे- शिवाजी देवीदास गौरकर, वय 70 वर्षे, रा. बार्शी नाका डी.आय.सी. रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 18.30 वा. सु. गजानन महाराज मंदीराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वरुडा रोड धाराशिव येथे उभा होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 1285 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून शिवाजी गौरकर यांना धडक दिली. या अपघातात शिवाजी गौरकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- समाधान शिवाजी गौरकर, वय 32 वर्षे, रा. बार्शी नका डी.आय.सी. रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : मयत नामे- रंभाजी काशीनाथ कांबळे, वय 75 वर्षे, रा. तिर्थ बु., ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.10.02.2024 रोजी 15.00 वा. सु. शेतातुन नागोबा मंदीरा जवळील कमानीजवळील रस्त्याने पायी घराकडे चालत येत होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 7227 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रंभाजी कांबळे यांना समोरुन धडक दिली. या अपघातात रंभाजी कांबळे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे-हनमंत रंभाजी कांबळे, वय 48 वर्षे, रा. तिर्थ बु., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नुकसान करणे
येरमाळा :फिर्यादी नामे- धनाजी पांडुरंग तौर, वय 76 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांचे वाघोली शिवारातील शेत गट नं 177, मधील पाच एकर उस व फिर्यादीचे भाउ तानाजी तौर यांचे वाघोली येथील शेत गट नं 176 मधील चार एकर उस अज्ञात व्यक्तीने दि. 14.03.2024 रोजी 04.00 वा. सु. आग लावून पेटवून देवून जाळून टाकून फिर्यादी व त्यांचे भाउ यांचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी धनाजी तौर यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 435 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.