• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…

नेमकं काय घडले, एकूण आरोपी किती, याची सविस्तर माहिती

admin by admin
November 4, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 2 mins read
तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर शहरात जुन्या वादातून १८ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला काठी, पट्टा व हत्याराने बेदम मारहाण करत त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्यासह ६ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत समीर जब्बार पटेल (वय १८, रा. वेताळ नगर, तुळजापूर) हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी. कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकत होता व पावाच्या भट्टीवर काम करत होता. संशयित माजी नगरसेवक संतोष उर्फ परमेश्वर देविदास कदम यांच्या मेहुण्याची (संजय जाधव) मुलगी आणि समीर हे एकाच महाविद्यालयात शिकत होते. समीर हा मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देतो, असा आरोप करत सुमारे तीन महिन्यांपूर्वी कदम यांनी पटेल कुटुंबीयांना घरी बोलावून समज दिली होती. त्यानंतर समीरने महाविद्यालयात जाणे बंद केले होते.

मंगळवारी (३ नोव्हेंबर २०२६) दुपारी समीर कॉलेजमध्ये परीक्षेसाठी गेला होता व सायंकाळी घरी परतला. दरम्यान, नातेवाईकाला आणण्यासाठी तो दुचाकीवरून घाटशिळ पार्किंगकडे गेला असता, संतोष कदम यांनी त्याला पकडून आपल्या घरी नेले.

घरात डांबून ठेवले आणि बेदम मारहाण केली

माहिती मिळताच समीरचे आई-वडील कदम यांच्या घरी गेले. तिथे संतोष कदम व त्याचा मेहुणा संजय जाधव यांनी समीरला मारहाण केली तसेच समीरच्या आईला शिवीगाळ व दमदाटी केली. काही वेळाने आरोपींनी बाहेरून इतर साथीदारांना बोलावून घेतले.

आरोपींनी समीर व त्याच्या नातेवाईकांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि समीरचे आई-वडील घरात असतानाच समीरला जबरदस्तीने सोबत नेले. त्यानंतर समीरचा चुलत भाऊ अरबाज अफसर सय्यद यालाही आरोपींनी उचलून नेले व दोघांनाही काठी, पट्टा आणि धारदार हत्याराने पाठीवर, पोटावर व पायावर जबर मारहाण केली.

पार्किंगच्या आडोशाला फेकून दिले, रुग्णालयात मृत घोषित

गंभीर जखमी अवस्थेत घरी पोहोचलेल्या अरबाजने घटनेची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी समीरचा शोध सुरू केला. तुळजापूर येथील भारतीबुवा मठाशेजारील पार्किंगमध्ये वॉचमनच्या घराच्या आडोशाला समीर गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. नातेवाईकांनी तात्काळ त्याला टेम्पोतून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

६ जणांवर गुन्हा दाखल

मयत समीरची आई अन्सर जब्बार पटेल यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • आरोपींची नावे:

    १. संतोष देविदास कदम (नगराध्यक्ष )

    २. संजय विलास जाधव

    ३. प्रणव देवकते

    ४. मस्के

    ५. अन्य २ अनोळखी इसम

  • दाखल कलमे:

    भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०३(१) (खून), १०९(१), १४०(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब रामचंद्र मांढरे करत आहेत. या घटनेमुळे तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

ताज्या बातम्या

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…

November 4, 2026
तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापुरात १८ वर्षीय समीर पटेल याची प्रेम प्रकरणातून हत्या ! घरात डांबले, मोबाईल हिसकावले अन्…
  • तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!