परंडा : २४ वर्षीय तरुणाचे अपहरण
भोत्रा (ता. परंडा) येथील ओमकार संजय जाधव (वय २४) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार परंडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ओमकार याला भोत्रा येथून अज्ञात कारणासाठी गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी त्याचे वडील संजय रंगनाथ जाधव (वय ४८, रा. भोत्रा, ता. परंडा) यांनी ४ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली. त्यावरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरमाळा : २० वर्षीय युवकाचे अपहरण; दोघांविरुद्ध गुन्हा
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोराखळी येथील २० वर्षीय खंडू दादाराव पेठे याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मस्सा खंडागळे ते मोहा जाणाऱ्या रस्त्याजवळ एमएन ५४८ परिसरातून खंडू पेठे याला नेण्यात आले.
या प्रकरणी बालाजी पवार (रा. येडशी) आणि संभाजी शंकर नलावडे (रा. हलदुगे) यांच्याविरुद्ध अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे.
खंडू याचा मित्र सागर दशरथ जाधव (वय २२, रा. चोराखळी, ता. कळंब) यांनी ४ नोव्हेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही घटनांमधील तरुणांचा शोध आणि प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.




