पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भास्कर कदम (रा. कन्हेरी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.
१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कन्हेरी येथे शेतातील जनावरांच्या गोठ्यासमोर हा प्रकार घडला. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने दत्ता मधुकर मगर (वय २५, अपंग) यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी आरोपीने विजेचा करंट देऊन मारून टाकण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी मीरा मधुकर मगर (वय ४८, रा. कन्हेरी) यांनी ५ नोव्हेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सचिन कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील कलम ९२(अ), ९२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.



