पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज बापुराव ढोबळे, नागेश बापुराव ढोबळे, रोहित राम शिंदे, राहुल दत्तात्रय ढोबळे, अंबादास मुरलीधर शिंदे आणि दत्तात्रय नरहरी ढोबळे (सर्व रा. तीर्थ खुर्द, ता. तुळजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तीर्थ खुर्द येथे हा प्रकार घडला. ‘माझी गाय तुम्ही मारली’ या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची गर्दी जमवून भास्कर केशव पौळ (वय ६५) आणि शशिकला केशव पौळ यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगड, विळा आणि काठीने हल्ला करून दोघांना जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी भास्कर पौळ यांनी ५ नोव्हेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२) आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.


