नळदुर्ग :आरोपी नामे-1)दिनेश मुळे, 2) शशिकांत मुळे, 3) दिपक मुळे सर्व रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.03.2024 रोजी 13.00 वा. सु. सैंदर्या कापड दुकान चे बाजूला इंद्रायनी जनरल स्टोअर्स अणदुर येथे फिर्यादी नामे- तुळशीराम दत्तु घोडके , वय 29 वर्षे, खुदावाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी चार वर्षाचा मुलगा हा फिर्यादीचे मोटरसायकल वरील पाण्याचे जारला धडकून रोडवर खाली पडल्याचे कारणावरुन फिर्यादीचे दुकानात घुसुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच मारहाण केल्यास त्याचा जिव जावू शकतो हे माहित असुनही गळ्यावर पाय ठेवून दाबले, व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तुळशिराम घोडके यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 308, 324, 323, 452, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा तालुक्यात दोन ठिकाणी हाणामारी
परंडा :आरोपी नामे-1) सोमनाथ कुंडलीक सस्ते, रा. कानडी, ता. भुम, 2) चंद्रकांत लोद, 3) बाळु लोद दोघे रा. आंतरगाव, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी 18.00 वा. सु. आंतरगाव गावातील हनुमान मंदीरासमोर फिर्यादी नामे- शशिंकात आत्माराम गोरे, वय 49 वर्षे, रा. आंतरगाव ता. भुम जि. धाराशिव ह.मु. 223 सीएनएस हॉस्पीटल सोलापूर यांना नमुद आरोपींनी आमच्या विरुध्द चोरीची केस करतो का या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन डोळ्यात तिखट टाकून लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिंकात गोरे यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 307, 326, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1) अशोक महादेव अनभुले, 2) हरिभाउ महादेव अनभुले, 3) बाळासाहेब महादेव अनभुले, 4) श्रीकांत महादेव अनभुले, 5) अनिता पदमसिंह अनभुले, सर्व रा. गोलेगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी 14.00 वा. सु. गोलेगाव येथील शेत गट नं 47 मध्ये फिर्यादी नामे- गोदाबाई जगन्नाथ मस्के, वय 70 वर्षे, रा. आष्टा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ज्वारीच्या उभ्या पिकात ट्रॅक्टर घालुन 20 ते 25 हजार रुपयाचे नुकसान केल्याने ते विचारण्यास गेल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन ढकलून दिले. व अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी गोदाबाई मस्के यांनी दि.21.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 143, 147, 149, 427, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.