तुळजापूर :आरोपी नामे-1) शिरीश चंदर मगर, 2) चंदर गणपती मगर, 3) शरद गणपती मगर, 4) योगेश चंदर मगर, 5) गणेश शरद मगर सर्व रा. रायखेल ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 18.03.2024 रोजी 20.30 वा. सु. रायखेल येथे फिर्यादी नामे- प्रदिप बिभीषन मगर, वय 37 वर्षे, रा. रायखेल ता. तुळजापूर यांना व फिर्यादीच्या भावाचा मुलगा रोहन असे दोघे शेतात जात असताना नमुद अरोपी कडून लाकडी बॅटने उडवलेला दगड हा रोहनला डोक्याला लागल्याने ते विचारण्यासाठी गेल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रदिप मगर यांनी दि.20.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 143, 147, 149, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे-1) राम भगवान भोसले, 2) दैवशाला भगवान भोसले, रा. लोहटा प.ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 16.03.2024 रोजी 17.00 वा. सु. लोहटा प. येथे शेतात फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर वसंत भोसले, वय 24 वर्षे, रा. लोहटा प. ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पाईपलाईनचा बॅंड मोडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी ज्ञानेश्वर भोसले यांनी दि.20.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-1) बाबासाहेब केदारीनाथ आडसुळ, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 20.03.2024 रोजी 16.00 वा. सु. हॉटेल राज बिअर बार समोर ईटकुर येथे फिर्यादी नामे- सुरज शिवाजी गंभीरे, वय 29 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांना गायीचे व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन गजाने कपाळवर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सुरज गंभीरे यांनी दि.20.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणुक
धाराशिव :आरोपी नामे-1)उमेश भोसले, रा. सांगली, 2) राजिव कुमार रा. गुरुग्राम हरियाणा, 3) रितबान चॅटर्जी, 4) दिग्वीजय नारायण, 5) हर्शद सैनी, 6) शैलजा तिवारी, 7) अरविंद शर्मा यांनी दि. 06.12.2021 रोजी पासून ते आज पावेतो रावसाहेब खटींग यांचे प्लॉट न बी 85 मध्ये सिंडकेट लिकर्स कार्यालय एमआयडीसी धाराशिव येथे फिर्यादी नामे- पृथ्वीराज युवराज आंधळे, वय 24 वर्षे, रा. गोरोबा गल्ली तेर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ब्लॅक शॉर्ट इंडिया प्रा.लि. हरियाणा या कंपनीची लिकरची डिस्ट्रीब्युटर्स शिप देतो म्हणून पृथ्वीराज आंधळे यांचे कडून वीस लाख रंपये घेवून खोटी कंपनी खरी असल्याचे कटकारस्थान रचुन खोटा करार नामा करुन विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी पृथ्वीराज आंधळे यांनी दि.20.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 120 (ब), 468, 471, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.