नळदुर्ग :आरोपी नामे-1)गुणवंत भिमाशंकर मुळे, 2) निलेश रमेश मुळे, 3) दिनेश भिमाशंकर मुळे, 4) अक्षय अनिल करपे, 5) अजय अनिल करपे सर्व रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 21.03.2024 रोजी 17.30 वा. सु. शेत गट नं 309 मध्ये अणदुर शिवारात फिर्यादी नामे- दिनेश शशिकांत मुळे, वय 30 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, दगड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे दिनेश मुळे यांनी दि.27.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 326, 324, 323,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)दिपक उर्फ धोंडुशा विजय कांबळे, 2) विश्वास उर्फ चिवड्या अप्पा उबाळे, 3) शेख सिताराम गायकवाड, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 26.03.2024 रोजी रात्री 01.00 वा. सु. केशेगव येथे समाज मंदीराच्या वट्यावर फिर्यादी नामे नवलिंग भिमराव कांबळे, वय 60 वर्षे, रा. केशेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा भाचा नामे अमोल रमेश बनसोडे रा. केशेगाव यास नमुद आरोपींनी दिपक कांबळे याचे लग्न तु का जमु देत नाही या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे नवलिंग कांबळे यांनी दि.27.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 307, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
भूम : भुम पो.ठा. चे पथक दि. 26.03.2024 रोजी 21.00 वा. सु. भुम पो.ठा. हद्दीत सुकटा येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना सुकटा येथे शासकीय दुध डेअरी समोर ता. भुम जि. धाराशिव येथील-तुषार विक्रांत हुंबे, वय 22 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे एक लोखंडी धातुचा सिल्वर रंगाचा मॅगझीन ग्रीप कळे आवरण असलेला गावठी कट्टा किंमत अंदाजे 30,000 ₹ ही बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती लोखंडी गावठी कट्टा जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 3, 25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.