• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार

रुग्णासोबत आलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

admin by admin
April 7, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे, एका कंत्राटी कर्मचाऱ्याने रुग्णासोबत आलेल्या महिलेवर एका रूममध्ये नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण सासूने आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी त्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी रात्री १० नंतर हा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी त्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खासगी कंपनीमार्फत साफसफाई आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून जिल्हा रुग्णालयात कामावर हजर असलेल्या गौरव विष्णू डोंगरे ( रा. वैराग रोड धाराशिव ) याने हा घृणास्पद प्रताप केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी गौरव विष्णू डोंगरे विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये भादवि ३५४, ३५४ ( अ १ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( सीआर नंबर १४४/२४ )

मिळालेल्या माहितीनुसार , धाराशिव तालुक्यातील एका खेडेगावातील एक महिला आपल्या आजारी मुलाला घेऊन, शुक्रवारी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. सोबत मदतीसाठी तिची सासू देखील आली होती. हा महिलेस गौरव डोंगरे याने फूस लावून रुग्णालयातील एका रूममध्ये नेले आणि तिचे स्तन दाबत असताना, तिच्या सासूने आरडोओरड केला, त्यामुळे रुग्णालयात गोंधळ सुरु झाला, त्यामुळे अनेक लोक जमले. लोकांची गर्दी पाहून गौरव डोंगरे याने रुग्णालयातून धूम ठोकली. सीसीटीव्ही फुटेजवरून सदर कंत्राटी कर्मचाऱ्याची ओळख पटली आहे.

याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याशी संपर्क साधला असून, या प्रकरणी सदर कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्यास तात्काळ कामावरून कमी केल्याचे सांगितले.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

खासगी कंपनीमार्फत रुग्णालयात वशिल्याने भरती
धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णलयाचे साफसफाई आणि स्वच्छता करण्याचे टेंडर एल. के ग्रुपला देण्यात आले आहे. या खासगी कंपनीने कंत्राटी कर्मचारी नेमताना, अटी आणि शर्तीचे पालन केले नाही. सर्व भरती वशिल्याने करण्यात आली आहे, स्वच्छता कर्मचारी ड्रेस कोडमध्ये नसतात. भारी कपडे घालून ते रुग्णालयात कामावर येतात पद स्वच्छता कर्मचारी आणि रुबाब डॉक्टरांसारखा असतो. त्यांचे काम कमी आणि इतर प्रताप जास्त चालू आहेत.याप्रकरणी एल. के ग्रुप वर कारवाई होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल

Next Post

धाराशिवमध्ये दिवसा घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये दिवसा घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!