धाराशिव – धाराशिव शहर आणि जिल्ह्यात दिवसाढवळ्या घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
अभिषेक बाबुराव मारवाडकर, वय 36 वर्षे, रा. शाहु नगर तावडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.03.02.2024 रोजी 08.30 ते 12.30 वा. सु तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 24.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 35,000 असा एकुण 1,08,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिषेक मारवाडकर यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे गुरनं 26/2024 कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणनेकामी धाराशिव जिल्हृयातील आंबी, भुम, वाशी व येरमाळा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान आंबी पोलीस ठाणे हद्दीत आलो असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, आंबी ते आनाळा रोडवर दोन इसम एक मोटर सायकलसह थांबलेले आहेत. त्यावर पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून बातमी प्रमाणे दोन इसम व एक मोटरसायकल सह मिळून आले त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले, वय 31 वर्षे रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहमदनगर, 2) शाम उत्तम पवार, वय 32 वर्षे, र. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड असे सांगीतले. त्यावर पथकाने नवनाथ भोसले याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की मी व माझे तीन भाउ यांनी मागील दीड वर्षातील काळात माझे बजाज मोटरसायकलवरुन धाराशिव शहरात दिवसा बंद असलेले आनंदनगर पो. ठाणे गुरनं 26/2024 कलम 454, 380, पो. ठाणे भुम गुरनं 53/2024, 28/2023 कलम 454, 380, पो. ठाणे वाशी 02/2024 454, 380, 12/2024, 91/2024, 188/2023, 189/2023, 254/2023, 278/2023, 321/2023 कलम 454, 380, भा.दं.वि.सं., पो.ठाणे येरमाळा 85/2024 कलम 454, 380 भा.दं.वि.सं., पो.ठाणे आंबी 140/2023 कलम 454, 380 भा.दं.वि.सं. असे एकुण 13 गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची मोटरसायकल 90,000₹ किंमतीची हस्तगत केली. नमुद आरोपीस चोरीच्या मोटरसायकलसह आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस नमुद आरोपींचा शोध घेत आहे.
सोयाबीन, ज्वारी, नांगर चोरी करणारे 3 विधीसंघर्ष बालक विशेष पथकाच्या ताब्यात
धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, नांगर चोरी करणारे 3 विधीसंघर्ष बालकांना विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. हे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात असताना दि. 06.04.2024 रोजी पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, काही इसम आपसिंगा ता. तुळजापूर येथे काही इसम चोरीच्या साहित्य घेवून विक्रीसाठी थांबले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरील पथक बातमीच्या ठिकाणी रवाना होवून बातमी मधील विधीसंघर्ष तीन बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावर विशेष पथकाने त्यांच्या ताब्यात असलेले 210 किलो दोन पोते सोयाबीन, बळीराम नांगर, 130 किलो ज्वारी असा एकुण 19,850₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याची खात्री करता ती पोलीस ठाणे तुळजापूर गुरंन 155/2024, 156/2024, 157/2024, 158/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद विधीसंघर्ष तीन बालकास चोरीच्या मालासह तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.