धाराशिव : मयत नामे- किरण शंकर धनके, वय 25 वर्षे, रा. कुमाळवाडी ता. जि. धाराशिव हे दि.07.05.2024 रोजी 09.00 वा. सु. वरुडा येथे पाझर तलाव येथे तळ्यामधील गाळ काढत होते. दरम्यान टिपर क्र एमएच 13 डीक्यु 5926 चा चालकाने त्याचे ताब्यातील टिप्पर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून किरण धनके यांना धडक दिली. या अपघातात किरण धनके हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद टिप्पर चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता व अपघाताची माहिती न देता टिप्पर जागेवर सोडून पसार झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल शंकर धनके, वय 29 वर्षे, रा. कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 187 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : मयत नामे-आण्णा गोरोबा घोडके, वय 44 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव हे दि. 04.05.2024 रोजी 23.00 वा. सु. रुईभर गावाजवळील पवार यांचे शेताजवळील पुलावरुन मोटरसायकल क्र एमएच 01 बीजे 4524 ही वरुन जात होते. दरम्यान पिकअप क्र एमएच 25 एजे 3748 चा चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप हे हायगई व निष्काळजीपणे चालवून आण्णा घोडके यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात आण्णा घोडके हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद पिकअप चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता व अपघाताची माहिती न देता पसार झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरविंद गोरोबा घोडके, वय 33 वर्षे, रा. बेंबळी धाराशिव ह.मु. समतानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 134(अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : मयत नामे-साकिब मुलुख दफेकर, वय 23 वर्षे, रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 28.04.2024 रोजी 21.00 वा. सु. दस्तापुर गावात जि.प. शळेजवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 एयु 1085 हीवरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 13 डीपी 4698 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून साकिब दफेकर यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात साकिब दफेकर हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. तसेच नमुद बोलेरो मोटरसायकल चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता व अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नय्यरपाशा सजादअली जागिरदार, वय 52 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : मयत नामे-अदित्य अच्युतराव किदंत, वय 28 वर्षे, रा. यशवंतराव चव्हाण चौक माउली नगर अंबाजोगाई जि. बीड हे दि. 16.04.2024 रोजी 22.3 वा. सु. पॉलिटेक्नीक विद्यालयाजवळ उड्डानपुल रोडवर धाराशिव येथे रोडलगत उभा होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून अदित्य किदंत यांना धडक दिली. या अपघातात अदित्य किदंत हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद अज्ञात वाहन चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता व अपघाताची माहिती न देता पसार झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अच्युत गोकुळराव किदंत, वय 61 वर्षे, रा. यशवंतराव चव्हाण चौक माउली नगर अंबाजोगाई जि बीड यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.