धाराशिव : फिर्यादी नामे- शमशोद्दीन नसरोद्दीन काझी, वय 61 वर्षे, रा.तांबरी विभाग एसआरटी कॉलनी घर नं 28/14 धाराशिव ता. जि. धाराशिव हे त्यांच्या राहात्या घराला कुलूप लावून घटस्फोटीत पत्नी अंबाजोगाई येथे मयत झालेच्या आरोपामध्ये बीड कारागृह मध्ये असताना फिर्यादीचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 13.02.2024 रोजी 15.00 ते दि. 05.05.2024 रोजी 08.30 वा.पुर्वी तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे 49,100 ₹ किंमतीचे दागिने व टाईल्स फरशी जरमनचे मोठे पातेले घरावरती टाकायचे पत्रे असा एकुण 62,100₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शमशोद्दीन काझी यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 457, 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-बिलाल ईस्माईल शेख, वय 30 वर्षे, रा. उजनी रोड पाण्याच्या टाकीजवळ बेंबळी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीचीमोटरसायकल एचएफ कंपनीची काळ्या रंगाची क्र एमएच 25 एक्यु 5123 ही दि.08.05.2024 रोजी 13.00 ते 13.15 वा. सु.सांजा रोड डॉ. पोलावर दवाखाण्याच्या बाजूस धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बिलाल शेख यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.