धाराशिव – शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये कॉन्सिल हॉल मध्ये आज दि. ५ जून रोजी पावणे एक वाजता प्रशासकीय अधिकारी संजय मगर , प्रशासन अधिकारी उदयकुमार पाध्ये यांच्यात कमिशन पैश्यावरून जोरदार भांडण , कमरीतुमरी, शिवीगाळ झाली. पैकी एकाने दुसऱ्याला मारण्यासाठी बूट काढला पण बाकीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली… हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करून, कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मागील काही दिवसापूर्वी एका कर्मचाऱ्याने एका रुग्ण महिलेचा विनयभंग केला होता, त्याची शाई वाळते न वाळते तोच, कर्मचाऱ्यांचा पैश्याच्या कमिशनवरून हाणामारीचा प्रकार उघडकीस आला आहे.
कंत्राटी भरतीसाठी पैसे घेणे, खरेदीमध्ये कमिशन खाणे यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज बदनाम झाले आहे.