येरमाळा : कळंब ते पुणे बसमध्ये कंडक्टने ओळखपत्र दाखवत म्हणताच शिवीगाळ करून दमबाजी करणाऱ्या एका प्रवाश्याविरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-राहुल बळीराम नव्हाट, वय 34 वर्षे, व्यवसाय वाहक ( बक्कल नंबर 15267 ) नेमणुक कळंब आगार ता. कळंब जि. धाराशिव हे दि.04.06.2024 रोजी 21.00 वा. सु.कळंब ते पुणे बस मध्ये जात होते . दरम्यान दहिफळ चौकात आरोपी नामे- महादेव निवृत्ती कदम, वय 55 वर्षे, रा. अभिषेक हाउसिंग सोसायटी आर.एच. 98 फ्लॅट नं 23 जी ब्लॉक एमआयडीसी शाहुनगर चिंचवड पुणे यांना फिर्यादीने ऑनलाईन तिकिटाची मागणी केली असता नमुद आरोपींनी ऑनलाईन तिकिट दाखवले .
सदर प्रवासी हा तोच आहे याची खात्री करण्यासाठी फिर्यादीने त्याच्या ओळखपत्राची विचारणा केली. त्यावर नमुद आरोपीने ओळखपत्र दाखवत नाही “माझे नाव महादेव कदम असुन मी माझे ओळखपत्र दाखवत नाही तुला काय करायचे ते कर” असे बोलून अरेरावीची भाषा करुन शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राहुल नव्हाट यांनी दि. 05.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठाणे येथे भा.दं.वि.सं कलम 353, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.