धाराशिव – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे चित्र मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील ढोकी, तुळजापूर आणि परंडा या तीन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये किरकोळ कारणांवरून लोकांना बेदम मारहाण करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ढोकी – मेहतरवाडी येथे ३१ जुलै रोजी महानंदा चव्हाण यांना त्यांच्या पुतण्याच्या घरासमोरील नालीतील पाणी काढण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली.
आरोपी नामे- उत्रेश्वर प्रभु चव्हाण, पृर्थ्वीराज हरी चव्हाण, रविराज हरी चव्हाण, हरी उत्रेश्वर चव्हाण, सिता उत्रेश्वर चव्हाण सविता हरी चव्हाण, रामदास चव्हाण, अभिमान प्रभु चव्हाण सर्व रा. मेहतरवाडी ता. धाराशिव यांनी दि.31.07.2024 वा. सु. मोहतरवाडी येथे फिर्यादी नामे- महानंदा शाम चव्हाण, वय 40 वर्षे, रा. मोहतरवाडी ता. जि. धाराशिव यांचा पुतण्या घरासमोरील नालीतील साठेलेले पाणी काडण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महानंदा चव्हाण यांनी दि.02.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 198(2), 191(2), 191(3), 190, 118(1) 115, 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर – तालुक्यातील सिंदफळ येथे ३१ जुलै रोजी कृष्णा घाटशिळे यांना त्यांच्या मुलीशी फोनवर बोलण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली.
आरोपी नामे-अविनाश बालाजी मिसाळ, बालाजी मिसाळ, श्रीमंत धनके, सर्व रा. सिंदफळ तुळजापूर, सर्व रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव 4) ब्रम्हदेव जाधव, क्रांती जाधव दोघे रा.कासारी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि. 31.07.2024 रोजी 14.30 वा. सु. मुद्दगलेश्वर मंदीर परिसरामध्ये सिंदफळ शिवार येथे फिर्यादी नामे- कृष्णा हणमंत घाटशिळे, वय 24 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीच्या मुलीस फोन करुन बोलण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णा घाटशिळे यांनी दि.02.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 118(2), 115, (2), 352, 351(2), 189(2), 181(2), 191(3) 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा – येथे ३१ जुलै रोजी अविनाश रणभोर यांना काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. आरोपी नामे- संदीप शिवाजी येवारे, आदित्य भरत जमदाडे,तुषार प्रशांत गायकवाड, शिवलिंग गायकवाड सर्व रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.31.07.2024 रोजी 20.30 वा. सु.महाराष्ट्र किराणा दुकानासमोर परंडा येथे फिर्यादी नामे-अविनाश दिलीप रणभोर, वय 33 वर्षे, रा. मंगळवार पेठ परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप, काठीने मारहण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश रणभोर यांनी दि.02.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 118(2), 118(1), 115, (2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनांमुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या घटनांच्या निषेधार्थ काही सामाजिक संघटनांनी निदर्शनेही केली आहेत.