धाराशिव – येथे 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डिजे वाद्यांचा बेसुमार वापर करण्यात आल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भिमराव कांबळे, सचिन बाबुराव पेठे, अमित भाउराव भोसले, अभिजीत बाळू कदम, अभिषेक गोकुळ बाबर आणि धिरज दत्तात्रय कदम यांनी पारंपारिक पद्धतीऐवजी डिजे डॉल्बी साउंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण केले. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
पोलिसांनी या प्रकरणी सहाही आरोपींविरुद्ध भादंवि कलम 223 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.