लोहारा – पोलीस ठाण्यात एका धक्कादायक घटनेची नोंद करण्यात आली आहे. येथील एका 17 वर्षीय मुलीवर गावातील दोन तरुणांनी तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने 2 ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी तरुण तिच्या राहत्या घरी ती एकटी असताना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करत असत.
पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 64 (1) सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अंतर्गत कलम 3, 4, 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे, पोलिस अधिक तपास करत आहेत.