धाराशिव शहरात आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयता आणि लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2024 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर नाका येथील शितल बारमध्ये हुसेन पापा शेख (वय 29) यांना मुजीद दिलावर शेख, मुजायीद मनसुर शेख आणि आरेफ दिलावर शेख या तिघांनी मारहाण केली. आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात हुसेन शेख हे जखमी झाले असून त्यांनी 3 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 118(1), 115(2), 351(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.