शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोविंदपुर येथे एका महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. शंकर अमृत मुंडे या आरोपीने प्रभावती मारुती मुंडे या ५५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली आणि डोक्याला धरून भिंतीवर आदळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
प्रभावती मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ३३३, ११८(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.