• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरासाठी २३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता

admin by admin
September 26, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरासाठी २३० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेले पाणी उचलले जात नसल्याने सध्या ५ ते ६ दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर, अमृत २ योजनेंतर्गत शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतून २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून रुईभर आणि तेरणा धरणांतून नव्याने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

शहरास दररोज ५३.४६४ एमएलडी पाणी पुरवण्यासाठी एकूण २३०.३२ कोटी रुपयांच्या निधीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या निधीच्या वाटपात केंद्र शासन ३३.३३ टक्के (७६.८७ कोटी), महाराष्ट्र शासन ५१.६७ टक्के (११९ कोटी) आणि स्थानिक स्वराज्य संस्था १५ टक्के (३४.५५ कोटी) असा सहभाग असेल.

धाराशिव शहरास तेरणा, रुईभर, आणि उजनी धरणांतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १९७० साली तेरणा धरणातून ४.८० एमएलडी क्षमतेची योजना आणि १९८८ साली रुईभर धरणातून ५.८० एमएलडी क्षमतेची योजना आखण्यात आली होती. याशिवाय २०१३ साली उजनी धरणातून ८ एमएलडी क्षमतेची योजना करण्यात आली होती, जी २०२० साली अमृत योजनेत सुधारणा करून १६ एमएलडी क्षमतेपर्यंत वाढवण्यात आली.

मात्र, रुईभर धरणातून येणारी पाइपलाइन दुष्काळामुळे गंजून खराब झाल्याने ती योजना २०१९ पासून बंद आहे. तसेच तेरणा धरणातील पाइपलाइन व मोटारी वारंवार दुरुस्तीची गरज भासल्याने केवळ २ एमएलडी पाणीच उचलले जात आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला ध्यानात घेता, १८ एमएलडी पाण्याचा पुरवठा अपुरा ठरत आहे, ज्यामुळे नागरिकांना दर ५-६ दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागत आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून अमृत २ योजनेंतर्गत २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून  पाणीपुरवठ्याची योजना तयार करण्यात आली असून, मानवसेवा कन्सल्टंटद्वारे तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, परंडा आणि कळंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

Next Post

मनोज जरांगे यांच्या कालच्या उपोषणावर फडणवीस स्पष्टच बोलले …

Next Post
मनोज जरांगे यांच्या कालच्या उपोषणावर फडणवीस स्पष्टच बोलले …

मनोज जरांगे यांच्या कालच्या उपोषणावर फडणवीस स्पष्टच बोलले ...

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026

Recent Posts

  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!