शिराढोण – शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोस्ट मास्तरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी एकनाथ जगन्नाथ कांबळे यांनी शाखा पोस्ट मास्तर या पदाचा गैरवापर करून १९ लाख ५६ हजार ४९९ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
आरोपी कांबळे हे मौजे निपाणी येथील पोस्ट ऑफिसमध्ये दि. १२ मे २०१५ ते दि. ६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शाखा पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी वेगवेगळ्या योजनांच्या खात्यातील रक्कम लाटल्याचा आरोप आहे. लातूर उत्तर विभागाचे सहाय्यक डाक अधिक्षक आनंद गोविंदराव कौठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कांबळे यांच्यावर भादंवि संकलम ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.