धाराशिव : मयत नामे- दादाराव साधु करवर, वय 65 वर्षे, रा. राघुचीवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.13.10.2023 रोजी 07.00 वा.सु. पिंपरी ता. जि. धाराशिव शेत शिवारात येथे लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- 1)राजेंद्र हनुमंत बेलदार, 2) अजीत हनुमंत बेलदार, 3)मनोज हनुमंत बेलदार, 4) गणेश हनुमंत बेलदार यांनी मयत दादाराव करवर यांना मागील सहा महिन्यापासून शेतीच्या कारणावरुन मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नानासाहेब दादाराव करवर रा. राघुचीवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि. 13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघातात एक ठार
धाराशिव :मयत नामे- बालाजी मुकींदा शिंदे, वय 65 वर्षे, रा.निलंगा ता. जि. लातुर हे दि.12.10.2023 रोजी 20.00 वा. सु. पॉलटेक्नीकल कॉलेज वन ऑफीसच्या समोर धाराशिव येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून बालाजी शिंदे यांना धडक दिली. या आपघातात बालाजी शिंदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी अक्षय मारुती शिंदे, वय 25 वर्षे, रा. धिरुबाई अंबानी शाळा जवळ बालाजी नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.