• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर

एका वर्षात तीन कंपन्यांच्या ऑर्डर!

admin by admin
October 25, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये मोठा गोंधळ समोर आला आहे. या महाविद्यालयात १६ विविध पदांवर काम करणाऱ्या १३७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या आत तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. परवा ,या कर्मचाऱ्यांना नवीन “स्मार्ट कंपनी”ची ऑर्डर देण्यात आली आणि त्यासोबत आयकार्डही वितरित करण्यात आले.

गेल्या वर्षभरात या कर्मचाऱ्यांना “ब्रिक्स” आणि “एनर्जी गो” या कंपन्यांकडूनही ऑर्डर देण्यात आल्या होत्या. प्रत्येक वेळी नवीन कंपनीच्या नावाने प्रोसेस फीसच्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे संकट असल्यामुळे कोणीही या प्रक्रियेविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाही.

विशेष म्हणजे, या प्रकारात एकाच मॅनेजरकडून तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या ऑर्डर दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक अर्हता नसलेल्या व्यक्तींनाही पैसे घेऊन ऑर्डर देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण काही कर्मचाऱ्यांना आवश्यक ती प्रशिक्षण मिळालेली नसल्याचे उघड झाले आहे.

या मॅनेजरसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे आहे. अधिष्ठता मॅडमची मूक संमती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व भोंगळ कारभार सुरु आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही.

या परिस्थितीत, शासकीय स्तरावर शैक्षणिक अर्हता तपासण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्याची गरज भासत आहे, ज्यामुळे महाविद्यालयातील या गोंधळाला पूर्णविराम मिळू शकेल.

Previous Post

रणजित पाटील यांचे तिकीट कन्फर्म, राहुल मोटे यांचा पत्ता कट

Next Post

विधानसभा निवडणुकीचा “विडा”: महाविकास आघाडीने गिळला !

Next Post
“परंड्याचं राजकीय नाट्य: उमेदवारीचा गोंधळ आणि हास्याचा महोत्सव”

विधानसभा निवडणुकीचा "विडा": महाविकास आघाडीने गिळला !

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल

September 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मेडसिंगा : घरातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर बांबू, फायटर अन् विटांनी जीवघेणा हल्ला

September 7, 2026
धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या

September 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026

Recent Posts

  • भिकारसारोळा : पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला ढोकी पोलिसांकडून अटक; गुन्हा दाखल
  • मेडसिंगा : घरातील हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर बांबू, फायटर अन् विटांनी जीवघेणा हल्ला
  • धाराशिव : पोलिसांच्या अंगावर टेम्पो घालून पळणाऱ्या महामार्गावरील कुख्यात लुटारू टोळीला एलसीबीने ठोकल्या बेड्या
  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!