धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या गजबजाट आहे. कारण ‘लाच प्राध्यापिके’ने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने कर्मचाऱ्यांच्या मनावर छाप टाकली आहे. यावेळी लाचखोरीच्या या खेळात बळी ठरले आहेत बदल्या आणि प्रतिनियुक्त्या.
बदल्यांच्या खेळात ‘मलिदा स्पेशल’
लाच प्राध्यापिकेने सुरुवातीला कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या जागांवर पाठवून ‘मलिदा’ गोळा केला. पण यामुळे तिची भूक अजून शमली नाही. जिल्हाधिकारी ट्रेनिंगला निघण्याच्या आधी, त्यांनी स्वतःच्या सहीने अजून मलिदा जमविण्याचा नवा मार्ग शोधून काढला.
“बदलत्या” डावपेचाची सुरुवात
प्रोटोकॉल पूर्ण करून पदस्थापना मिळालेल्या कर्मचाऱ्यांची सुखाची नोकरी बघून प्राध्यापिकेच्या पोटात गोळा उठला. लगेचच बोगस नॉन-क्रीमिलियर जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने सर्व प्रतिनियुक्त्या रद्द केल्या. आता कर्मचाऱ्यांची पुन्हा धडपड सुरू झाली आहे. पण यावेळी, सोयीच्या जागेसाठी प्राध्यापिकेला तृप्त केल्याशिवाय पर्याय नाही!
“कर्मचाऱ्यांच्या खिशावर लाच प्राध्यापिकेचा हक्क”
धाराशिवच्या या अनोख्या प्राध्यापिकेने ठरवलंय, की कोणतीही प्रतिनियुक्ती लाचशिवाय होणारच नाही. आता कर्मचाऱ्यांना आपापल्या जागेसाठी प्राध्यापिकेच्या “तिजोरी”त आपलं योगदान द्यावं लागणार आहे.
“किती वसूल, कोणाकडून वसूल?”
या नाटकाचा शेवट कधी आणि कसा होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. पुढील काही दिवसांत ‘लाच प्राध्यापिके’च्या वसुलीचा आकडा आणि तिच्या नव्या ‘डावपेचां’ची मजा पाहायला मिळणार, एवढं मात्र नक्की!
– धाराशिवकरांच्या वतीने, बातमीदार बोरूबहाद्दर