• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढली

 आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा इशारा

admin by admin
December 21, 2024
in मुख्य बातमी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढली
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातही काही तालुक्यांत संघटित गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “अशा संघटित गुन्हेगारांना कायदेशीर अद्दल घडवू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

सध्या जिल्ह्यात पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारी क्षेत्रातील लोक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना वेठीला धरून त्यांना त्रास देणे, दबाव टाकणे अशा स्वरूपाची कृत्ये समोर आली आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

“कोणाला जाणीवपूर्वक कोणी त्रास देत असेल तर त्यांनी रीतसर आवश्यक त्या पुराव्यासह पोलिसांकडे तक्रार द्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कठोर भूमिका घेतली आहे. संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी मोक्कासारखा कायदा वापरला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातही मोक्का कायद्याचा वापर करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

पवन ऊर्जा प्रकल्पासाठी झालेल्या जमीन खरेदीत काही अनियमितता झाल्यास, जमीन मालक किंवा शेतकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पासाठी झालेल्या जमीन खरेदीत कांही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाले असतील,जमीन मालक किंवा शेतकरी यांच्या कांही तक्रारी असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “पवन ऊर्जा प्रकल्प – जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती” स्थापन केली असून त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक देखील सदस्य आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी जर जमीन खरेदीच्या अनुषंगाने कांही तक्रारी असतील तर त्याबाबत दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.
-आ. राणाजगजितसिंह पाटील

Previous Post

जनावरांची क्रूरतेने वाहतूक; तामलवाडी पोलिसांनी आरोपीला केली अटक

Next Post

तुळजापुरात गुंडांचे राज्य, पोलीस प्रशासनाचा ‘आशिर्वाद’

Next Post
तुळजापुरात गुंडांचे राज्य, पोलीस प्रशासनाचा ‘आशिर्वाद’

तुळजापुरात गुंडांचे राज्य, पोलीस प्रशासनाचा 'आशिर्वाद'

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group