• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरच्या मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्यांची रिऍक्शन

त्वचेचे पापुद्रे निघाले, उपचाराला यश नाही

admin by admin
January 16, 2025
in मुख्य बातमी
Reading Time: 1 min read
तुळजापूरच्या मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्यांची रिऍक्शन
0
SHARES
757
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्यांची रिअॅक्शन होऊन तिच्या त्वचेचे पापुद्रे निघण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यात असा प्रकार गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच घडला असून, गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली मुलीवर उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप उपचार यशस्वी न झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत गावात सर्वेक्षणादरम्यान मुलीला तोंडावर पांढरा चट्टा आढळून आला. हा कुष्ठरोगाचा चट्टा असल्याचे निष्पन्न झाल्यावर २२ ऑक्टोबर २०२४ पासून तिला ‘डॅप्सोन’ नावाच्या गोळ्या देण्यात आल्या. मात्र, काही दिवसांतच गोळ्यांची रिअॅक्शन सुरू झाली आणि मुलीच्या अंगावर पुरळ व खाज सुरू झाली.

११ नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर मुलीला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन लाख रुपये खर्च करूनही फरक पडला नाही. त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी डॉ. मारुती कोरे यांनी सांगितले की, असा प्रकार हजारातून एखाद्या रुग्णाला होऊ शकतो आणि यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग मुलीची योग्य काळजी घेत असून तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, उपचार करूनही फरक जाणवत नसल्याने पालक चिंतेत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि कोठेच परिणामकारक उपचार होत नसल्याने कुटुंब हवालदिल झाले आहे.

Previous Post

धाराशिव : शिंगोली बायपासजवळ ट्रक पलटी; अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद ( Video )

Next Post

१४ वर्षीय मुलाचे अपहरण, शिराढोण पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

१४ वर्षीय मुलाचे अपहरण, शिराढोण पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

June 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

June 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

June 18, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

“आमची बहीण कुठेय सांग!”… भररस्त्यातून तरुणाचे अपहरण करत बीडच्या ‘त्या’ कुटुंबाने काठीने झोडपले; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

June 18, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

‘पैसे काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा! मोदाणी बिल्डिंगसमोरील SBI ATM मध्ये हातचलाकी; ७८ हजार लंपास

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group