कळंब – तालुक्यातील लोहाटा पूर्व येथील १४ वर्षीय समादान पांडुरंग बोरगे याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान हा दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई शिताबाई बोरगे यांनी त्याचा शोध घेतला असता तो कुठेच सापडला नाही. अखेर त्यांनी दिनांक १५ जानेवारी रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शिताबाई बोरगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. समादानचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
समाधानच्या अपहरणामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.