धाराशिव – शिंगोली बायपास येथे आज सकाळी 8.37 वाजता एक भीषण अपघात घडला. कळंबहून धाराशिवला येणाऱ्या बसने मेघदूत हॉटेलसमोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक घासत जाऊन पलटी झाला.
या अपघातात बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने ट्रक ड्रायव्हर सुरक्षित आहे. मात्र, बस ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या स्थितीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. अपघाताची घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, परंतु पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली आहे. प्रशासनाने वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.
Video