• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा तालुक्यात बस अपघात, एक ठार, अनेक जखमी

admin by admin
January 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
567
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

आंबी – परंडा तालुक्यातील हरणवडा येथे एका भीषण बस अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता घडली.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या विरभद्र पाटने हे रोहकल ते परंडा जाणारी एमएच २० बीएल २१०५ क्रमांकाच्या बसमधून प्रवास करत होते. हरणवडा येथे आल्यावर बसचालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या निलगिरीच्या झाडाला धडकली.

या अपघातात तात्या पाटने हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय कंडारी येथील आनंद हणुमंत घोडके, प्रतिक्षा विठ्ठल पाटील, साक्षी मारुती सोनवणे, नम्रता नागनाथ शिंदे आणि इतर काही प्रवासीही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर कंडारी येथील आप्पासाहेब शेषनाथ गवळी यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक विठ्ठल दत्तु तौर याच्याविरुद्ध भादंवि कलम २८१, १२५(अ),(ब), १०६(१), ३२४(४) आणि १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

धाराशिव तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

बेंबळी: धाराशिव तालुक्यातील ताकविकी शिवारात  भीषण अपघात घडला. या अपघातात शंकर चंद्राप्पा मस्के (वय 35 वर्षे, रा. तोरंबा) यांचा मृत्यू झाला.

मस्के हे आपले हॉटेल बंद करून तोरंबा येथे जाण्यासाठी पायी निघाले होते. त्याचवेळी लातूर ते तुळजापूर जाणाऱ्या हायवेवर हॉटेल खंडेराया जवळून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार (क्रमांक MH 11 BD 9797) ने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत मस्के हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडवून कारचालक जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला.

मयत शंकर मस्के यांच्या पत्नी द्रोपदी मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार कारचालकाचा शोध सुरू केला आहे.

Previous Post

वाशी तालुक्यात शेतकऱ्याच्या तुरीच्या ढिगाऱ्यास जाळून ७० हजारांचे नुकसान

Next Post

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next Post
डॉ. आंबेडकर साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

April 14, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भाविकांना रुम विचारल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी ५ जणांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

April 14, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

April 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक; तुळजापुरात ६० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास

April 14, 2026
धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

April 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group