• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : सरकारी निधीचा ‘पाळणा’ – तलाठी कार्यालयाच्या इमारतीत वऱ्हाह पालन!

admin by admin
January 30, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापूर : सरकारी निधीचा ‘पाळणा’ – तलाठी कार्यालयाच्या इमारतीत वऱ्हाह पालन!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर  – “जनतेसाठी” हे घोषवाक्य घेऊन सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून तलाठी कार्यालयांच्या इमारती बांधल्या, पण प्रत्यक्षात या इमारतींचे उपयोग ‘जनतेसाठी’ कमी आणि ‘वराहांसाठी’ जास्त होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे! तुळजापूर शहरातील एका नव्याकोऱ्या तलाठी कार्यालयात ‘वराह पालन’ सुरू असल्याचे वृत्त सामाजिक प्रश्नांची जाण असणारे अमोल जाधव यांनी उघड केले आहे.

इमारत तलाठ्यांसाठी की वराहांसाठी?

महसूल विभागाने तलाठ्यांना सुसज्ज कार्यालय मिळावे म्हणून मोठा निधी खर्च करून सुंदर इमारती बांधल्या. पण सरकारला एवढा आनंद झाला की, त्या इमारती तलाठ्यांच्या हवाली करायलाच विसरले! त्यामुळे तलाठ्यांनीही परिस्थितीचा फायदा घेत दुसरीकडे भाड्याने जागा घेतली आणि या इमारती हवामान निरीक्षणासाठी किंवा ‘वराह पालनासाठी’ उपयुक्त असल्याची शासकीय मोहर लागली.

वराहांचे ‘शासकीय वारसाहक्क’

तुळजापूर शहरातील नव्याने उभारलेल्या तलाठी कार्यालयात सध्या वराहांची वसाहत तयार झाली असून, त्यांनी या शासकीय जागेचा “गावरान” कब्जा घेतला आहे. अद्ययावत कार्यालयात गादीऐवजी गवताचे गोधडी अंथरले गेले असून, माहिती फलकाच्या ठिकाणी आता वराहशास्त्राचे नवे नियम झळकत आहेत.

तलाठ्यांचे ‘व्यवसायभान’!

दुसरीकडे तलाठ्यांनी महसूल विभागाचा कारभार ओळखून ‘स्मार्ट’ निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतःच एका खासगी इमारतीत भाड्याने जागा घेऊन, तिथेच “भाडेतत्त्वावर तलाठी कार्यालय” सुरू केले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी तलाठ्याला शोधायला जंगलात न जाता थेट बाजारात जावे, अशी सोय करण्यात आली आहे.

जनतेचा प्रश्न – “ही इमारत खरंच तलाठ्यांसाठी होती का?”

गावकऱ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. तलाठ्यांचे कार्यालय कोठे आहे? सरकारी इमारतीत की दुकानात? हे कळत नसल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. महसूल विभाग यावर सडेतोड उत्तर देईल का, की “वराहसंवर्धन योजनेंतर्गत” या इमारतींचा उपयोग केला जात असल्याचे सांगेल, हे पाहणे रंजक ठरेल!

“कोट्यवधींचा खर्च धुळखात की गवतखात?”

सरकारने लाखो रुपये खर्च करून तलाठी कार्यालय उभारली, पण तलाठ्यांच्या उपस्थितीऐवजी वराहांचा वावर अधिक असल्याने हा पैसा शेवटी धुळखात गेला की गवतखात, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने लवकरच निर्णय घ्यावा, अन्यथा पुढच्या टप्प्यात या इमारतींवर अन्य चौपायांचा ताबा बसेल, असा गावकऱ्यांचा इशारा आहे!

Video 

 

Previous Post

तुळजापूर घाटात खासगी बस पलटी; महिलेचा मृत्यू

Next Post

धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर

Next Post
धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर

धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर

ताज्या बातम्या

राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

 राणेंचा ‘लेटमार्क’, दूतांची मनधरणी आणि ठाकुरांचा ‘ताईसाहेबांना’ सणसणीत टोला!

August 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून पुन्हा तुफान राडा!

August 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यात शेतीच्या वादातून पती, पत्नी अन् मुलाला कोयता व काठीने बेदम मारहाण

August 6, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहरात घरफोडी करणाऱ्या चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

August 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!