धाराशिव जिल्ह्यातील पहिलं डिजिटल चॅनल – धाराशिव लाइव्ह!
१३ वर्षांपूर्वी एका ध्येयाने सुरू झालेला हा प्रवास आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. या १३ वर्षांत अनेक वादळं आली, अनेक खोट्या केसेस दाखल झाल्या, पण धाराशिव लाइव्हची लेखणी कधीच झुकली नाही, ना कधी झुकणार!
वेग हीच ओळख!
“आजची बातमी उद्या कशाला? आजच नाही, तर आत्ता!”
हीच धाराशिव लाइव्हची कार्यशैली. बातमी सत्य असेल, तर ती कोणीही दाबू शकत नाही. सत्य सांगण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत धाराशिव लाइव्हकडे आहे – आणि याच हिमतीमुळे आम्ही ‘सर्वात वेगवान चॅनल’ म्हणून ओळखले जातो.
भ्रष्टाचाराचा पर्दाफाश!
१३ वर्षांत कितीतरी प्रकरणं हाताळली, भ्रष्टाचार उघड केला, आणि परिणाम?
- काहींवर कारवाई झाली
- काही अधिकारी निलंबित झाले
- काहींना शिक्षा भोगावी लागली
सत्य बाहेर आलं की कुणालाही ते पचत नाही, म्हणूनच विरोध झाला. पण आम्ही झुकलो नाही. कारण पत्रकारिता म्हणजे भीतीपोटी मूक होणं नाही, तर सत्याच्या बाजूने उभं राहणं!
धाराशिव लाइव्ह – जनतेचा आवाज!
कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही, कोणत्याही नेत्याचं नाही – हे चॅनल फक्त आणि फक्त जनतेचं आहे!
ना आम्ही बातमीसाठी पैसे घेतो, ना आम्ही पैसे घेऊन बातम्या दाबतो!
तुमच्या समस्यांसाठी आम्ही आहोत!
अन्याय सहन करू नका. आवाज उठवा! धाराशिव लाइव्ह तुमच्या सोबत आहे.
- पोलीस असोत किंवा महसूल अधिकारी – कुणाच्याही दबावाखाली आम्ही येत नाही.
- पुरावे पाठवा, तुमचं नाव गुप्त राहील.
- संपादक सुनील ढेपे यांच्याशी थेट संपर्क साधा.
☎️ कॉल करा किंवा मेसेज करा – 738799911
सत्याचा आवाज दडवता येत नाही, कारण आम्ही लढतोय तुमच्यासाठी!