धाराशिव: धाराशिव लाइव्हने सातत्याने उघड केलेल्या भ्रष्टाचार मालिकेमुळे डीन गंगासागरे यांच्या नवीन कारनाम्यांचा पर्दाफाश होत आहे. आता २०२२ मध्ये लाखो रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा उघड झाला असून, खरेदी केलेले साहित्य एका खोलीत धूळ खात पडले आहे.
📌 लाखोंच्या खरेदीचा ‘तोंडी हिशोब’!
२०२२ मध्ये कपाट, खुर्च्या, बेंच, कॉम्प्युटर आणि प्रयोगशाळेतील अन्य साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र, कोणत्या विभागाला किती साहित्य दिले गेले याचा कोणताही अधिकृत हिशोब नाही.
- या खरेदीचा कोणताही लेखाजोखा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेला नाही.
- संपूर्ण व्यवहार तोंडी हिशोबाच्या आधारे करण्यात आला आहे, ज्यामुळे लाखोंचा अपहार झाल्याचा संशय आहे.
- खरेदी केलेले साहित्य विद्यार्थ्यांच्या वापरासाठी न देता एका खोलीत धूळ खात पडले आहे.
📌 गंगासागरेंचा महाविद्यालयातील ‘अजेंडा’ – रिटायरमेंटपूर्वी हात साफ करायचे!
डीन गंगासागरे गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालयात कार्यरत आहेत.
- प्रथम वैद्यकीय अधिकारी, मग एचओडी आणि आता डीन – इतक्या वर्षांत त्यांनी महाविद्यालयाच्या संसाधनांवर स्वतःचा मजबूत पकड ठेवला आहे.
- २०२७ मध्ये ते रिटायर होणार असल्याने, त्यांनी आता जास्तीत जास्त ‘संधी’ मिळवून घेत गंगेत हात धुण्याचा सपाटा लावला आहे.
- खरेदी घोटाळा, वृक्षतोड घोटाळा, शिपाई सावकारी घोटाळा यासारख्या भ्रष्ट कारभारामुळे महाविद्यालयाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.
➡️ आता चौकशी होणार का? की भ्रष्टाचाराचा गंगासागर वाहत राहणार?
डीन गंगासागरे यांचे कारनामे उघड होत असतानाही प्रशासन आणि सरकार शांत आहे. आता या घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, की हा भ्रष्टाचार कायमचाच सुरू राहणार?
👉 धाराशिव लाइव्ह याप्रकरणात आणखी खुलासे करत राहील!