• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बेंबळी : हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
February 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी  – धाराशिव जिल्ह्यातील मेंडसिंगा येथे हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुलसी दगडू शिंत्रे (रा. मेंडसिंगा, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, तिने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

अंबिका भैरवनाथ भोंग (वय ३८, रा. समता नगर, औसा, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी दगडू रामचंद्र शिंत्रे (पती), नंदाबाई रामचंद्र शिंत्रे (सासू), रामचंद्र शिंत्रे (सासरे) आणि विकास रामचंद्र शिंत्रे (दिर) यांनी हुंडा न दिल्याच्या कारणावरून तुलसी यांना सतत छळले. तसेच, लग्नातील मानपान, डोहाळेजेवण व बारश्याचा कार्यक्रम छोटा केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बेंबळी पोलिसांनी भा.दं.वि. कलम ८०(२), ८५, १०८, ३५२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज कांड – तीन ड्रग्ज पेडलर ९ दिवस कस्टडीत, चौथा रडारवर!

Next Post

धाराशिवमध्ये दोन युवकांकडून तलवार जप्त; गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये दोन युवकांकडून तलवार जप्त; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर बॉम्बस्फोटाचा बनाव!

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन चोरीचे गुन्हे; सौर प्रकल्पातील केबलसह अवैध वाळू साठ्याप्रकरणी गुन्हे दाखल

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम – छोटा हत्ती’ गाडीतून ४ गोवंशीय जनावरांची सुटका; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे जुन्या वादातून राडा!

August 4, 2026
धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

August 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!