धाराशिव जिल्हा न्यायालयाने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तिन्ही ड्रग्ज पेडलरना ९ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. आता चौकशीत काय बाहेर येतंय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय!
कोण आहेत हे तीन ड्रग्ज पेडलर?
- अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (रा. तुळजापूर)
- युवराज देविदास दळवी (रा. तुळजापूर)
- संदीप संजय राठोड (रा. नळदुर्ग)
पोलिसांच्या हाताला लागलेला मुद्देमाल:
- 45 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज – किंमत ₹2,15,000
- गुन्ह्यात वापरलेली मोटार कार (MH 25 R 5598) – ₹7,50,000
- चार स्मार्टफोन – ₹1,72,000
आणखी एक मासा जाळ्यात अडकणार?
या प्रकरणात तुळजापूर नगरपालिकेच्या आस्थापना विभागातील एका महिलेचा मुलगाही गुंतलेला असल्याचा संशय आहे. त्याला अटक झाली, तर थेट एका माजी नगराध्यक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे!
पालकमंत्री सरनाईक यांचा अल्टिमेटम – ७२ तासांत निकाल पाहिजे!
ड्रगचा काळाबाजार करून हजारो तरुणांना देशोधडीला लावून श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र क्षेत्र भष्ट करणाऱ्या ड्रग माफियांना सोडणार नाही.पोलीस प्रशासनाने पुढील ७२ तासांमध्ये या संदर्भात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल आपणाला सादर करावा.असे निर्देश परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलिसांना दिले आहेत, त्यामुळे पोलिसांची धावपळ सुरू असून, अजून काही मोठी नावे बाहेर येण्याची दाट शक्यता आहे!
या ड्रग्ज कांडातून अजून कोणते धक्कादायक खुलासे होतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे!