• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरचा ‘रस्ता’ वादाच्या गर्तेत! मातीमिश्रित काँक्रीट

तफावतीचे काम, प्रशासनाचा टोलवाटोलवीचा खेळ!

admin by admin
February 28, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
अणदूरचा ‘रस्ता’ वादाच्या गर्तेत! मातीमिश्रित काँक्रीट
0
SHARES
169
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातील श्री खंडोबा देवस्थान परिसरातील रस्त्याचे काम नव्या वादात अडकले आहे. २ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या ४०० मीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम( एकेरी बाजू ) ८०% पूर्ण झाले असले, तरी नालीशिवाय रस्ता, अतिक्रमण हटवण्याची अनिच्छा आणि कामाच्या गुणवत्तेवर उठलेले प्रश्न या सर्वांमुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे.

हुतात्मा स्मारकातील डेपोतूनच मातीमिश्रित काँक्रीट?

विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी एम-30 दर्जाच्या काँक्रीटचे काम करणे अंदाजपत्रकात नमूद असताना  त्यामध्ये माती मिसळलेली डस्ट वापरली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एका बाजूचे काम गुणवत्तेशिवाय? मोठ्या साईजची तफावत!

रस्त्याच्या एका बाजूचे काम दर्जाहीन पद्धतीने करण्यात आले असून, त्याच्या साईजमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे काम योग्य प्रकारे झाले आहे का, याची चौकशी तज्ज्ञ गुणविशेष पथकाकडूनच (Technical Inspection Team) झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

ग्रामपंचायत-तहसील प्रशासन एकमेकांकडे बोट!

अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
➡ ग्रामपंचायत म्हणते: “अतिक्रमण हटवण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, ते तहसील कार्यालयाने करावे!”
➡ तहसील कार्यालय म्हणते: “ग्रामपंचायतीने स्वतःच हे काम करावे!”

नायब तहसीलदारांचा ‘गायब’ दौरा!

आज नायब तहसीलदार मयुरा पेरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करायची होती, पण दिवसभर वाट पाहूनही त्या आल्या नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकरणी त्यांनी याआधी  पाहणी टाळली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

रस्ता दर्जाहीन राहणार की चौकशी होणार?

अणदूरमधील हा रस्ता योग्य दर्जाचा होणार की टोलवाटोलवीच्या गडबडीत टिकाऊपणा गमावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन गुणवत्तेची चौकशी करावी आणि अतिक्रमणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून जोर धरत आहे!

Previous Post

तुळजापूर-लातूर महामार्गाच्या नावाखाली खनिज लूट! तहसीलदारांच्या कारवाईची प्रतिक्षा

Next Post

धाराशिव शहरात घरफोडी! ४५ हजारांचा ऐवज चोरीला!

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव शहरात घरफोडी! ४५ हजारांचा ऐवज चोरीला!

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

June 5, 2026
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

June 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी हद्दीत संतापजनक! १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; मदत करणाऱ्या महिलेसह दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये ‘ॲपल हॉटेल’समोर थरार; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दुचाकीची तोडफोड; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

June 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group