धाराशिव : धाराशिव शहरातील साईनगर परिसरात एका घरातून ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख १८ हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
अमोल रमेश पवार (वय ३०) यांनी या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवार हे मूळचे लातूरचे असून सध्या धाराशिवमध्ये साईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. २२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्यापासून ते २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या दरम्यान घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली.
पवार यांच्या तक्रारीनुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 331(3),331(4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कळंब प्रशासकीय इमारत: रजिस्ट्री कार्यालयातून टीव्ही चोरी
कळंब – कळंबमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असलेल्या रजिस्ट्री कार्यालयातून एका अज्ञात व्यक्तीने सुमारे १२,००० रुपये किमतीचा टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंब पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायंकाळी ६:०० ते २६ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ९:४५ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. एनओसी कंपनीचा टीव्ही रुम नंबर १७ मधून चोरण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहन खंडेराव कुलकर्णी (वय ५५, रा. कुसुम नगर भुम, ता. भुम, जि. धाराशिव) यांनी २६ फेब्रुवारी, २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीविरोधात भा.द.वि. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी: शेतातून लोखंडी अँगलची चोरी, एकाला अटक
वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून सुमारे ३०,००० रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरल्याप्रकरणी एका व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. प्रभाकर तुळशीराम ढवळे (वय ५८, रा. तपोवन शेजारी वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्या वाशी शिवारातील शेत गट नं. २७ मधून साडेसहा फुटांचे एकूण ३४ लोखंडी अँगल चोरीला गेले.
तानाजी शामराव काळे (रा. बारलोणी पारधी पीडी, ता. वाशी, जि. धाराशिव) याने हे अँगल चोरल्याचा आरोप आहे. प्रभाकर ढवळे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तानाजी काळे याच्याविरुद्ध भा.द.वि. कलम ३०३ (२), ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मुरुम: येणेगुर पाणीपुरवठा योजनेतून मोटार चोरीला
मुरुम – येणेगुर येथील पाणीपुरवठा जलकुंभातून एका अज्ञात व्यक्तीने १५ एचपीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११:३० ते २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने जेएमपी कंपनीची सुमारे ८,००० रुपये किमतीची मोटार चोरून नेली.
कुमार प्रकाश येडगे (वय ३५, रा. येणेगुर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.द.वि. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
परंडा: जामगावमधून ९४ हजारांच्या शेळ्यांची चोरी
परंडा तालुक्यातील जामगाव येथून ९४ हजार रुपये किमतीच्या सहा शेळ्या आणि तीन पाटी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९:३० ते २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे २:५० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. धर्मराज ज्ञानोबा गिरी (वय २६, रा. जामगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांच्या जामगाव शिवारातील शेत गट नं. २५ मधून या शेळ्या आणि पाटी चोरीला गेल्या.
धर्मराज गिरी यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.द.वि. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.