उमरगा तालुक्यातील तुरोरी गावात पाणीवाटपाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
पहिला गट:
- राधिका सूर्यकांत सूर्यवंशी, सूर्यकांत बळीराम सूर्यवंशी, भाग्यश्री सूर्यकांत सूर्यवंशी, सरुबाई बळीराम सूर्यवंशी (सर्व रा. तुरोरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी गोविंद बिरु सूर्यवंशी (वय ७४) आणि त्यांचा मुलगा बिरु सूर्यवंशी यांना नळाच्या पाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी गोविंद बिरु सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.द.वि. कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरा गट:
- गोविंद बिरु सूर्यवंशी, रुक्मिणी पांडुरंग सूर्यवंशी, बिरु गोविंद सूर्यवंशी, लक्ष्मी बिरु सूर्यवंशी, बाबूराव पांडुरंग सूर्यवंशी (सर्व रा. तुरोरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी राधिका सूर्यकांत सूर्यवंशी (वय ४०) आणि त्यांची मुलगी व पती यांना नळाच्या पाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, काठी, वीट आणि वेलीच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी राधिका सूर्यकांत सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.द.वि. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या दोन्ही घटनांनंतर तुरोरी गावात तणावाचे वातावरण असून, पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.