वाशी- वाशी तालुक्यातील गोलेगाव आणि वाशी शिवारात विद्युत खांबावर काम करत असताना विजेचा शॉक लागून एका लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत विष्णु मोटे (वय 33, रा. पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) हे 11 केव्ही लाईटच्या पोलवर काम करत असताना त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. हा प्रकार 11 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान घडला. विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत मृताच्या वडिलांनी विष्णु विठ्ठलराव मोटे (वय 55, रा. पारगाव, ता. वाशी) यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रोहन गपाट, प्रतीक पारडे, एम.एस.ई.बी. चे उपअभियंता चौधरी, शाखा अभियंता तुरखुडे, ऑपरेटर अशोक जगताप आणि लाईनमन प्राची देवळे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 106(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, मृत्यू नेमक्या कोणत्या निष्काळजीपणामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे.





