धाराशिव – धाराशिव तालुक्यातील अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत काही दिवसापूर्वी बालविवाह पार पडला होता. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांना ग्रामीण पोलिसांनी अभय दिल्याने उलट- सुलट चर्चा सुरु आहे.
धाराशिव तालुक्यातील अंबेहोळच्या जिल्हा परिषद शाळेत काही दिवसापूर्वी बालविवाह पार पडला होता. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याकडुन चिरीमिरी उकळून पोलिसांनी या दोघांना अभय दिले आहे.
या विवाहाला मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी रीतसर परवानगी दिली होती. पोलिसांनी या दोघांना नोटीस दिली आणि त्यांना भीती दाखवून चिरीमिरी उकळल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
या प्रकरणात अनेक आरोपी असताना, फक्त पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून, पोलीस अधीक्षकांनी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर तर दोषी मुख्याध्यापिका आणि गट शिक्षण अधिकारी यांच्यावर जिल्हा परिषद सीईओनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.