तामलवाडी : माळुंब्रा गावात आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जय जगदीश वढणे, ओम जगदीश वडणे, पिंटु आंबादास तेलंग व इतर सात जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास माळुंब्रा येथे सुखदेव तमन्ना देवकर (वय 44) यांना आरोपींनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, काठी व लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर सुखदेव देवकर यांनी 21 ऑगस्ट रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.