ढोकी – तुगाव येथे 19 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते 10:15 च्या दरम्यान गुरुनाथ शेंडगे यांच्यावर सहा जणांनी मिळून क्रूरपणे मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात नागनाथ शेंडगे, वैभव शेंडगे, विशाल शेंडगे, शकुंतला शेंडगे, मनिषा शेंडगे (सर्व रा. तुगाव, ता. जि. धाराशिव) आणि सोनाली आप्पासाहेब पांढरमिसे (रा. घानेगाव ता. बार्शी जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गुरुनाथ शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने आणि दगडाने बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुलांनाही आरोपींनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीसांनी या प्रकरणी भादंवि कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींपैकी अद्याप कोणाहीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.