• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भांडणाचा जाब विचारल्याने तरुणांवर खुनी हल्ला

तुळजापूरजवळील कुंभारीतील घटना; सहा जणांना अटक, दोन दिवसांची कोठडी

admin by admin
March 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
2.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : चुलत भावासोबत झालेल्या भांडणाचा जाब विचारताना हत्यारानिशी आलेल्या सात जणांनी दोन सख्ख्या भावांवर खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवन पंडीत तांबे (वय २१) व सौरभ पंडीत तांबे (वय १९, दोघेही रा. कुंभारी, ता. तुळजापूर) अशी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास कुंभारीजवळील महादेव मंदिरासमोर घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुंभारीजवळील मंगरुळ गावातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पवन आणि सौरभ जात होते. यावेळी समोरून ओमराज वडणे, जयराज वडणे आणि शिवरत्न पंडीत हे येत होते. त्यांना पाहून फिर्यादी पवन तांबे याने आपली दुचाकी बाजूला घेतली आणि शिवरत्नला ‘ओमसोबत भांडण का केले?’ अशी विचारणा केली. याचा राग आल्याने शिवरत्नने ‘तू कोण विचारणार’ असे म्हणत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळात इतर संशयित तिथे गोळा झाले आणि त्यांनी मारहाण सुरू केली. ‘थांबा, आता तुम्हाला जीवच मारतो’ अशी धमकी देत ओमराज, जयराज आणि शिवरत्न यांनी पवन आणि सौरभवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांनाही समर्थ, हणुमंत आणि शुभम यांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली. तसेच, पंडीत वडणे याने ‘यांना जीवे मारा’ अशी चिथावणी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिवरत्न पंडीत वडणे, ओमराज दिपक वडणे, जयराज दिपक वडणे, समर्थ बाळासाहेब वडणे, हणुमंत अशोक वडणे, शुभम विष्णू वडणे आणि पंडीत जनार्धन वडणे (सर्वजण रा. कुंभारी, ता. तुळजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील पंडीत वडणे हा संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

जखमींच्या कानावर, छातीवर आणि पाठीत वार

या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेले पवन व त्याचा भाऊ सौरभ यांना सोमनाथ कापसे यांनी तातडीने तुळजापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून पुढील उपचारांसाठी दोघांनाही धाराशिव येथील ‘सिव्हिल’ रुग्णालयात पाठविण्यात आले. पवनच्या अंगावर गंभीर स्वरुपाचे चार वार असल्याने त्याला धाराशिवहून सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सौरभच्या खांद्यावर, पाठीवर आणि छातीवर तीन वार झाले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे करीत आहेत.


Previous Post

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

Next Post

वीज उपकेंद्रात घुसून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; दोन तास वीजपुरवठा खंडित करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वीज उपकेंद्रात घुसून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; दोन तास वीजपुरवठा खंडित करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

May 7, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

साडेसांगवीत जलजीवनच्या कामात अडथळा; ग्रामसेवकाला दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

May 7, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस; येरमाळा व मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

May 7, 2026
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

शिराढोण येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

May 7, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

May 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group