• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

admin by admin
March 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तब्बल १४ वर्षे चाललेली प्रदीर्घ सुनावणी, साक्षी-पुराव्यांची तपासणी आणि आरोपींचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार असून, त्या दिवशी कोर्ट निकालाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.

१६ महिन्यांचा प्लॅन आणि परदेशी शस्त्रांचा वापर

पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १६ महिने कट रचला गेल्याचे तपासात समोर आले आहे. फेब्रुवारी २००५ मध्ये लातूर येथे रेकी करण्यात आली होती, मात्र तो प्रयत्न फसला. अखेर ३ जून २००६ रोजी कळंबोली येथे ही हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे पवनराजे यांच्यावर २ गोळ्या झाडल्या, ज्यातील एक त्यांच्या डोक्यात लागली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून चालक समद काझी यांच्यावरही १ गोळी झाडण्यात आली. पवनराजे यांच्याकडे स्वतःचे परवानाधारक रिव्हाल्वर होते, मात्र त्यांना ते काढण्याची संधीच मिळाली नाही. या हत्येत ‘मेड इन युएसए’ आणि ‘चायना’ बनावटीची परदेशी शस्त्रे वापरण्यात आली होती.

३ तपास यंत्रणा आणि १२८ साक्षीदार

या हायप्रोफाइल प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर सीआयडी आणि शेवटी सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला होता. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर सीबीआयने तपासाची चक्रे फिरवली. या खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह एकूण १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.

२५ लाखांची सुपारी आणि ९ आरोपी

सीबीआयच्या आरोपानुसार, राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांनी २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. या प्रकरणात एकूण ९ आरोपी आहेत:

१. डॉ. पद्मसिंह पाटील (माजी गृहमंत्री)

२. पारसमल जैन बादला

३. दिनेश तिवारी (शूटर)

४. मोहन शुक्ला (नगरसेवक, मुंबई)

५. सतीश मंदाडे (लातूर)

६. पिंटू सिंग उर्फ महात्मा चौधरी (शूटर)

७. कैलास यादव (बसपा नेता, युपी)

८. शशिकांत कुलकर्णी (माजी उत्पादन शुल्क निरीक्षक)

९. छोटे पांडे


कोर्टाची कडक भूमिका:

शूटर पिंटू सिंग सध्या बिहारच्या सिवान कारागृहात आहे, त्याला हजर करण्यासाठी कोर्टाने वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहेत. इतर आरोपी जामिनावर असून, हजेरीसाठी टाळाटाळ करणाऱ्या आरोपींना कोर्टाने कडक तंबी दिली असून २४ मार्चला सर्व संशयितांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

एकूण १,२५० पानांचे लेखी म्हणणे कोर्टासमोर मांडण्यात आले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने पवनराजे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून, हे प्रकरण राजकीय द्वेषातून गोवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सीबीआयने मांडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष पाहता कोर्ट काय निकाल देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Previous Post

परंड्यात भरचौकात राडा; दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

Next Post

भांडणाचा जाब विचारल्याने तरुणांवर खुनी हल्ला

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भांडणाचा जाब विचारल्याने तरुणांवर खुनी हल्ला

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!