भूम – हात उसने दिलेले पैसे परत घेण्याच्या कारणावरुन रिव्हॉलव्हरने गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपीस खुनासाठी जन्मठेप व 10,000/- रुपये दंड तसेच शस्त्र अधिनियम उल्लघंनासाठी सहा महिने सश्रम कारावास व 2000/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
दि. 29.02.2020 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. मौजे पाटसांगवी , ता. भुम येथे यातील आरोपी नामे बाबा उस्मान पटेल, वय 34 वर्षे, रा. पाटसांगवी याने इसम नामे दस्तगीर जिलानी पटेल यास हात उसने दिलेले पैसे परत घेण्याचे कारणावरुन त्याचे जवळील लायन्सनधारी रिव्हॉलव्हरने गोळी झाडून जिवे ठार मारुन शस्त्र अधिनियमाचे उल्लघंन केले वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन भुम पोलीस ठाणे येथे गुरनं 31/2020 भादविस कलम 302 सह शस्त्र अधिनियम कलम 30 प्रमाणे दिनांक 29/02/2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ नेमणुक भुम पोस्टे यांनी करुन . न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यात उगले सो, अतिरीक्त सत्र न्यायाधिश, अति सत्र न्यायालय भुम यांनी सदर आरोपीस दोषी धरुन खुनासाठी जन्मठेप व 10,000/- रुपये दंड तसेच शस्त्र अधिनियम उल्लघंनासाठी सहा महिने सश्रम कारावास व 2000/- रुपये दंडाची शिक्षा दि. 13.10.2023 रोजी सुनावली आहे. सदर केसमध्ये शासकीय अभियोक्ता म्हणून गाडे यांनी कामकाज पाहिले आहे.
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, धाराशिव व अपर पोलीस अधीक्षक . नवनीत कॉवत, धाराशिव यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम, गौरीप्रसाद हिरेमठ यांनी व श्री प्रल्हाद सुर्यवंशी, पोनि भुम पोस्टे यांनी वेळोवेळी सदर केसचा पाठपुरावा करुन कोर्ट पैरवी अधिकारी सपोउपनि/बी. एम. बळे नेमणूक येरमाळा पो. स्टे यांना सुचना देवून आढावा घेत होते. त्यामुळे सदर आरोपीस न्यायालयाने पुराव्याचे आधारे शिक्षा सुनावली आहे.