नळदुर्ग – अक्कलकोट रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर त्याचे काम सुरु झाले होते. मात्र काही दलालांनी शेतकऱ्यांना जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून हे काम अनेक ठिकाणी अडवले आहे. शासनाने नियमाप्रमाणे मोबदला देऊन देखील आणखी मोबदला मागण्यासाठी उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. कोर्टाने त्यांना फटकारले तरी हे दलाल अजून ताळ्यावर आले नाहीत.
नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात घडत आहेत. शालेय विद्यार्थी, महिला यांचे आतोनात हाल होत आहेत. त्याचे या दलालांना सोयरसुतक नाही. या दलालांनी रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तलावात काही दिवसांपूर्वी जलसमाधी आंदोलन करण्याची नौटंकी केली. संबंधित अधिकाऱ्यानी नौटंकीची दखलच घेतली नाही. या उपस्थित पोलिसाने मारा उड्या आणि मरा म्हटल्यानंतर त्यांची नौटंकी उघडी पडली. कुणी सुद्धा वाचवायला आले नाही. शेवटी तेच पोहत बाहेर आले. या फ़टफ़जितीची जोरदार चर्चा सुरु आहे.
नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्यावर काही दलालांनी स्वस्तात जमिनी घेऊन आता दहा पट मावेजा मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरले आहे. अश्या दलालांवर गुन्हे दाखल करून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहेत.शेतकऱ्यांना भूलथापा देऊन विकासाच्या आड येणाऱ्या दलालाविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पूर्वीचा जो रस्ता आहे, त्याचे काम करण्यास देखील हे दलाल अडथळा निर्माण कीर्त आहेत. अश्या दलालांवर कठोर कारवाई करून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.