• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, March 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम : ऊसतोडीच्या उचलीवरून मारहाण; जाचाला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

admin by admin
March 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
112
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : ऊसतोडीसाठी घेतलेली उचलीची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून एका मजुराला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यात उघडकीस आली आहे. या जाचाला कंटाळून ४२ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रणजीत सर्जेराव सानप (वय ४२, रा. उळूप, ता. भूम, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी एकावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रणजीत सानप यांनी ऊसतोडीसाठी आरोपी औदुंबर ऊर्फ पिनू विष्णू दराडे (रा. रामेश्वर, ता. भूम) याच्याकडून पैशांची उचल घेतली होती. मात्र, काही कारणास्तव रणजीत यांनी ते पैसे परत केले नव्हते. याच रागातून आरोपी औदुंबर दराडे याने रणजीत यांना रामेश्वर येथे डांबून ठेवले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

आरोपीकडून सतत होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रणजीत सानप यांनी बुधवारी (ता. ११) सायंकाळी सात ते गुरुवारी (ता. १२) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान बऱ्हाणपूर शिवारातील चौघुले यांच्या शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तानाजी पंडित सानप (वय १९, रा. उळूप, ता. भूम) यांनी गुरुवारी (ता. १२) दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपी औदुंबर ऊर्फ पिनू दराडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), १२७(२) (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे) आणि ११५(२) (मारहाण करणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भूम पोलीस करत आहेत.


Previous Post

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

Next Post

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम : ऊसतोडीच्या उचलीवरून मारहाण; जाचाला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाशी : शेंडी शिवारात दरोड्याचा डाव उधळला; पाच जणांच्या टोळीला बेड्या

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group