भुम : आरोपी नामे-रुपेश अशेक साळुंखे, रा. पाथरुड, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 23.05.2024 रोजी 20.00 वा. सु. पाथरुड बसस्थानक ता. भुम जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-रणवीर रामकिसन बोराडे, वय 24 वर्षे, रा. पाथरुड ता. भुम जि. धाराशिव, यांना नमुद आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन कटारीने पोटावर व हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे वडील रामकिसन बोराडे यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रणवीर बोराडे यांनी दि.24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरोपी नामे-1)बंडोपत गोरख चव्हाण, 2) समाधान अविनाश रसाळ,3) सुमित रणदिवे, 4) अविनाश गोरख चव्हाण, 5) गोरख सोपान चव्हाण, 6) नांगराबाई गोरख चव्हाण सर्व रा. चव्हाणवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 22.05.2024 रोजी 17.00 वा. सु. चव्हाणवाडी येथे फिर्यादी नामे-युवराज दुष्यंत नवगिरे, वय 40 वर्षे, रा. चव्हाणवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना शासकीय रस्त्याच्या कामात विनाकारण आडवा आडवी का करतो या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन जिवीतास धोका होवू शकतो हे माहित असतानाही लोखंडी रॉड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- युवराज नवगिरे यांनी दि.24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 341, 308, 324, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.